Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

मुंबई दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट विहित कालमर्यादेत पूर्ण करावे असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद विभागातील सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करावेत

रखडलेल्या व लहान पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी,शाश्वत कार्यरत नळ जोडणीची (functional household tab connection) उद्दिष्ट्ये साध्य करावीत.तसेच नवीन योजनांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करावेत. त्याला मंजुरी घेणे, निविदा काढणे, कार्यादेश देणे ही सर्व कामे विहित मुदतीत करावीत, असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

बाह्य स्रोतांद्वारे मनुष्यबळ घ्यावे

काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे.अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

औरंगाबाद विभागात आठ जिल्ह्यांत ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी सुमारे ७ लाख २४ हजार ९०४ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या विभागातील ८ जिल्ह्यांमध्ये जल जीवन मिशन आराखड्यात एकूण ८ हजार ५९९ गावे व ७ हजार ७९६ योजना प्रस्तावित आहेत व त्याची किंमत सुमारे ३ हजार ८१६ कोटी रुपये आहे अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड यांच्यासह औरंगाबाद विभागातील अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तीन हजारात साठ हजार रुपयांचे पिक विमा संरक्षण फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी 1 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी 1 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo