Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-२०२१’ एकमताने मंजूर

मुंबई(प्रतिनिधी)- कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केले.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-2021’ एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, सहकार्यवाह रविंद्र देसाई, कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकट काळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्कतेने कार्यरत रहावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-2021’ बाबत चर्चा करून हा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू

Next Post

फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo