Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 – देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात नेमुन दिलेल्या कर्तव्यामध्ये कसुर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलभ रोहण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आला आहे. अशावेळी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जे कोणी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल. नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे. अन्यथा त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

त्याचबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करणाऱ्या आंगणवाडी सेविका, अशावर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर आरोग्य विभागाने तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता महिला बचतगटांनी तयार केलेले मास्क खरेदी करावे. तसेच निवारागृहातील नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची तपासणी संबंधित नोडल अधिकारी यांनी करावी. नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याकरीता जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखेर त्या वाघोद्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

Next Post

कोरोना तपासणी लॅब जिल्ह्यात सुरु करा-पालकमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

कोरोना तपासणी लॅब जिल्ह्यात सुरु करा-पालकमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo