Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – राज्य शासनाच्या 14 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना 100% अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांना 4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल 5 लाख रपये प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल 8 लाख रुपये प्रती एकर याप्रमाणे मिळेल.

            सदर योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, लाभार्थी दारिद्रयरेषेखालील भूमिहीन असावा, लाभार्थ्यांचे किमान वय 18 व कमाल 60 वर्ष असावे. लाभार्थ्यांची निवड करताना दारिद्रय रेषेखालील भुमिहिन परितक्त्या, विधवा आणि अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जातीचे अत्याचारग्रस्त महिलांना प्राधान्य देण्यात येईल.

            दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्दांना जी जमीन वाटप करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी  तर  समिती सदस्यपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख, सह निबंधक, नोंदणी शुल्क व मुल्यांकन, उपविभागीय अधिकारी (संबंधित तालुका) हे असतील तर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे सदस्य सचिव आहेत.

            कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील व्यक्तींनी 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्धतेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची बैठक संपन्न

Next Post

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री सुनिल केदार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री सुनिल केदार जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo