Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कलेच्या दृष्टीने पिसुर्वो यांची मॉर्डन आर्ट वेगळेपण सिध्द करणारं – अशोक जैन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 30 प्रतिनिधी – जगभरातील १६ देशात ज्यांच्या चित्रकलेला मानाचे स्थान त्यांनी श्रध्दापूर्वक मोठेभाऊ तथा भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रांचा आविष्कार केला. कलावंत ज्यावेळी सभोवतालची सृष्टी जेव्हा आपल्या आतल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा तो कुंचल्यातून सजीव करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रतिभावंतावर जीवनमूल्यांची सखोल जाण असली तर त्या कलाकृती निश्चितच व्यापक भावार्थ घेऊन साकार होतात. भवरलालजी जैन यांच्या ८५ चित्रांकृती मनाला आनंद देणाऱ्या, चांगल्या कृतीचा जागर करणाऱ्या सुंदर मनाचं प्रतीक आहे असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

जामनेर येथील जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो) यांनी भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त मोठेभाऊंच्या जीवनावर आधारित ८५ चित्र चितारलेली आहेत. त्या ‘A tribute to बडे भाऊ’ चित्रप्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि.३० डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वांना उद्यानाच्या वेळेत पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जगविख्यात चित्रकार जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो), चोपडा ललित कला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन, तरूण भाटे, विकास मल्हारा, विजय जैन, सचिन मुसळे, सुशील चौधरी, सचिन मुसळे, चेतन पाटील, योगेश सुतार, मनोज जंजाळकर, जितेंद्र चौधरी, रूपाली पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.


कान्हदेशातील मातीत वाढून जगाला वेगळी ओळख निर्माण करणारे भवरलालजी जैन हे जामनेर तालुक्यातील वाकोद येथील आणि चित्रकार पिसुर्वो ही जामनेर तालुक्यातीलच. पिसुर्वो यांनी कान्हदेशातील रंग, माती, संस्कृती आणि निसर्गाला आपल्या विशिष्ट चित्रशैलीत जगासमोर आणले. यातून त्यांची जवळपास १६ देशांमध्ये प्रदर्शनी कलाप्रेमींना भुरळ करून गेली. याच भूमिपुत्राने आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत तथा उद्योजकाच्या उद्देशून ‘माणूस कितीही व्यस्त किंवा मोठा असला तरी समाजासमोर तो अनेकांतील एक असतो’ तसे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन. यांच्या जीवनावरती ८५ चित्रे चितारलेली आहेत. कलाप्रेमींसाठी सतत प्रोत्साहन देणाऱ्या भवरलालजी जैन यांच्या चित्रांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व कलाप्रेमींसह रसिकांना प्रदर्शनामध्ये अनुभवता येईल.
पिसुर्वो यांनी जीवनातील सात या आकडाचे गणित उलगडे आणी सात पासून सुरू झालेला चित्रप्रवास सांगताना मोठ्याभाऊंची पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला. सातपुड्याचा सात रांगा, अंबाई, निंबाई, उमाई, गौराई, मुक्ताई, पावराय, भिवराई या सात बहिणींचे प्रतिकात्मक इन्स्टाॕलेशन मांडले आहे. कान्हदेशाची संस्कृती, निसर्ग येथील मातीतील रंग, सुगंध यातुन एखादी व्यक्ती आपल्या भूमितील कलावंताला प्रोत्साहन देण्यासाठी जी साथ देतो ते अधोरिखेत करणारी कृतज्ञतेचे प्रतिकात्मक दर्शन पिसुर्वो यांच्या प्रदर्शनात दिसते. भवरलालजी जैन यांच्या आदर्श असलेले महात्मा गांधी यांच्यापासून समाजाकडे विश्वस्त या भावनेने पाहण्याची ऊर्जा, केळी,आंबा लागवड यासह तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या जीवनमात घडविलेला बदल, यातुन ग्रामीण भागात निर्माण झालेले रोजगाराचे जाळे यासह पिसुर्वा यांच्या २००६ ते २०२२ पर्यंत चा चित्रप्रवास या प्रदर्शनात पाहता येईल. यासाठी वसंत वानखेडे कलादानास जळगावकरांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जामठी येथील वृक्षतोडप्रकरणी वेगळे वळण.!!!

Next Post

पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी

Next Post
पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी

पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d