Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कसारा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हिवरे यांचा इंडोनेशियात सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कसारा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हिवरे यांचा इंडोनेशियात सन्मान

बाली येथे शैक्षणिक व सांस्कृतिक परिषदेत राज्यातील ३० उपक्रमशील शिक्षकांचा सहभाग

कसारा/ठाणे – (प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यातील ३० उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी नुकतेच इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक परिषदेत आपले विविध कौशल्य दाखवून देशाचे प्रतिनिधीत्व केले. राज्यातील शिक्षकांनी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये, आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन इंडोनेशियातील अध्यापन पद्धती समजून घेतली. तसेच आपल्याकडील शैक्षणिक पद्धती व विचारांचे आदान प्रदान केले. यात शहापूर तालुक्यातील कसारा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा विकास हिवरे यांनी इतर आठ शिक्षकांप्रमाणेच गणित या विषयावर प्रभावी प्रेझेंटेशन केले. यात मनिषा हिवरे यांनी नऊ शिक्षकांमध्ये अतिउत्तम सादरीकरण केल्यामुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे मनिषा हिवरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे. या परिषदेला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, प्रगती पाटील त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागाचे संचालक मारुती गोंधळी, म.राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव ज्ञानेश्वर म्हात्रे, सिने कलाकार स्वप्निल फडके, ठाणे जि.प. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पवार आदी मान्यवर भारताच्या वतीने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने गरजूंना १२० ब्लँकेट वाटप

Next Post

उर्दू साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल असलम तनवीर यांना वकार-ए-क़लम अवार्ड

Next Post

उर्दू साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल असलम तनवीर यांना वकार-ए-क़लम अवार्ड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo