Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी 1 मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी लागवड करु नये. अन्यथा गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.


शेतकऱ्यांना कापुस बियाणे जरी 1 मे पासुन उपलब्ध झाली तरी बागायती कापुस लागवड 1 जुन नंतरच करावी. मे महिन्याच्या मध्यावधीत तापमान 45 अंश ते 47 अंश से. पर्यंत असते, त्यामुळे जास्त तापमानात लागवड केल्यास बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नवीन अंकुर वाळुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते व मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचप्रमाणे लवकर लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. कारण मान्सुनचा चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत सुप्ताअवस्थतेत असलेले पतंग अंडी घालतात यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. याउलट जुन महिन्यात लागवड केलेले पिक पहिल्या पाऊस होण्याच्या वेळेस वाढीच्या अवस्थेत असल्याने व पात्या फुले नसल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंगांना अंडी देण्यासाठी पिक उपलब्ध न झाल्याने ते अंडी घालु शकत नाहीत व ते नष्ट झाल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणुन जास्त तापमानाच्या विपरीत परिणाम व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन मागील दोन वर्षापासुन आपण बागायती कापसाची लागवड 1 जुन नंतर करावी अशी शिफारस करीत आहोत व त्याचे चांगले परिणाम आपल्याला मागच्या दोन हंगामामध्ये दिसुन आलेले आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, पुर्व मशागत, ठिबक संचाची जोडणी इ. कामांचे चांगले नियोजन मे महिन्यात करुन 1 जुन नंतरच कापुस बियाण्यांची लागवड करावी. त्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाचेल व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल.
येत्या खरीप हंगामासाठी आणि स्वत:च्या चांगल्या स्वास्थासाठी सर्व शेतकरी बांधवाना कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडुन शुभेच्छा देण्यात येत असल्याचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेआहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मी कर्त्यव्यापासून परावृत्त व्हावे याकरिता हा प्रयत्न असावा – पो.नि.अरुण धनावडे

Next Post

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी दिले तहसीलदार माधुरी आंधले यांना निवेदन

Next Post
अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी दिले तहसीलदार माधुरी आंधले यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo