Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुपन असतील त्यांनीच वैद्यकीय तपासणीसाठी यावे;दिव्यांग मंडळाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या कार्यवाहीसाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी तारखेचे कुपन आगाऊ देण्यात आले आहे. ज्या बांधवांना ११ ऑगस्टचे कुपन मिळाले आहे त्यांनीच बुधवारी रुग्णालयात दिव्यांग तपासणीसाठी यावे, विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

रुग्णालयात कोरोनाविरहित आजारांवर उपचार सुरु झाले आहे. त्यासोबत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणीसाठीदेखील २८ जुलै पासून सुरुवात झाली आहे. दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ११ व १८ ऑगस्टची कुपन आरक्षित झाली आहे. तर २५ ऑगस्टच्या तपासणीसाठीचे कुपन वितरित करणे सुरु आहे.

प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून वैद्यकीय अधीक्षक कक्षातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित उपचाराची कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

कुपन मिळण्यासाठी अशी करा प्रक्रिया

प्रमाणपत्र कार्यवाहीकरीता दिव्यांग बांधवाना सोयीचे व्हावे यासाठी आता आगाऊ बुकिंग करण्यासाठी कुपन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. दर बुधवारी २०० दिव्यांगांची तपासणी होणार आहे. दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक यांनी संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवाचे ओळखपत्र दाखवून दिव्यांग बोर्डात पडताळणी करावी. नंतर रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कार्यालयीन वेळेत कुपन प्राप्त करू शकतात. कुपन शासकीय सुटी आणि बुधवार वगळता इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वितरित होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

Next Post

सारा केसर मँगो बागेत हजारो वृक्षांचे रोपण केतकी कोकोनटच्या वर्षपूर्तीनिमित्‍त वाढदिवस साजरा

Next Post
सारा केसर मँगो बागेत हजारो वृक्षांचे रोपण केतकी कोकोनटच्या वर्षपूर्तीनिमित्‍त वाढदिवस साजरा

सारा केसर मँगो बागेत हजारो वृक्षांचे रोपण केतकी कोकोनटच्या वर्षपूर्तीनिमित्‍त वाढदिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo