Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृष्णानगरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गाळेधारक, रहिवाश्यांचे पुनर्वसन करूनच जागा घ्या -मुख्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील कृष्णानगर येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरील गाळेधारकांचे, रहिवाश्यांचे तसेच शाळेचे पुनर्वसन करूनच जमीन उपलब्ध करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन गाळेधारक, रहिवाशी तसेच शाळेबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्देश दिले.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातील कृष्णानगर येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील गाळेधारक व्यावसायिक, शाळा तसेच रहिवाश्यांना हटविण्याची कार्यवाही सुरु केली होती. त्याबाबत आमदार श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर वस्तुस्थिती मांडली.

त्यावर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या गाळेधारक व्यावसायिक, रहिवाश्यांचे तसेच येथील शाळेचे पुनर्वसन करूनच जागा उपलब्ध करून घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले. विशेषतः या ठिकाणच्या शाळेलाही जलसंपदा विभागाची जमीन देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांनाही दिलासा मिळेल अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश खाडे यांची परिचय केंद्राला भेट

Next Post

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d