Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा : नगरसेवक डॉ. फेगडे यांची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
Private: शेतकऱ्यांची पिळवणूक तात्काळ थांबवावी-डॉ. कुंदन फेगडे

यावल-(प्रतिनिधी) – केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी अशी मागणी यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, गेल्या अनेक दिवसापासून केळीचे बोर्डाचे भाव आणि खरेदी भाव यात तफावत आहे. जे बोर्डाने ठरवलेले भाव असतात ते व्यापारी मान्य करत नाहीत आणि अतिशय पडलेल्या भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून नफेखोरी करत आहे या सर्व व्यवस्थेवर बाजारसमित्यांचा वचक नसून बाजार समितीत अनेक वेळा ठराव करून सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे १००० रु चा बोर्डाचा भाव असताना सुद्धा २०० ते ३०० रुपयांपर्यंत केळी खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, शेतमाल शेतातच पिकतो, वाया जातो. तरी कापणी होत नाही या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून आपण उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि योग्य कारवाई न झाल्यास रास्ता रोको आदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

जास्त जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना तरी व्यापाऱ्यांच्या दारात काहीतरी स्थान असते. परंतु अल्पभूधारक शेतकरी बोलूसुद्धा शकत नाही आणि त्याची जास्तच पिळवणूक होते. केळी महामंडळ स्थापन होईल तेव्हा होईल आणि उपाययोजना करेल तेव्हा करेल तोपर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मरणयातना सोसायच्या का? असा प्रश्न डॉ. कुंदन फेगडे यांनी विचारला आहे. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र वामन कोल्हे, परेश नाईक, रितेष बारी तुषार चौधरी मनोज बारी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नविन साठवण तलाव उभारणीत भ्रष्टाचार; चौकशीसाठी भाजपाचे साखळी उपोषण

Next Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

Next Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d