Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ, जि. जळगाव या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            प्रवेशासाठी अटी व शर्ती अशा : इच्छुक विद्यार्थी धनगर समाजाचा (भटक्या जमाती –क) असावा, विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) दाखल्याची साक्षांकित प्रत व मूळ प्रत तपासण्यासाठी सादर करावी,  विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल, तर त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये राहील. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर 2021 रोजी सहा वर्षे पूर्ण असावे, दुसरी च्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे, विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत, निवासी शाळेत राहणाऱ्या विदयार्थ्याना वर्षातून दोनदा पालकांना भेटण्याकरीता प्रवास खर्च देण्यात येईल.  विधवा / घटस्फोटीत / निराधार / परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करण्यात येईल,

             प्रवेश अर्जासाठी बियाणी पब्लिक स्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ, जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव येथे सुनील पीहुल  (9764061014) यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकीत प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेऊन सदरील अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा : नगरसेवक डॉ. फेगडे यांची मागणी

Next Post

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo