Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगांव-(प्रतिनिधी) – येथील के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे व्हरच्यूँअल आंतरराष्ट्रीय परिषद दि.११ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि संशोधन परिषदेचे उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. न्यु नॉर्मलमध्ये व्यवसाय आणि संशोधनातील शाश्वत संकल्पना हा या परीषदेचा प्रमुख विषय आहे.या परिषदेचे अध्यक्षस्थान श्री. डी.टी. पाटील, के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन सदस्य हे भुषविणार असून सावित्रीबाई’ पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा.डॉ.प्रफुल पवार यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. दुबई विद्यापीठाचे इमेरिटस प्रोफेसर डॉ.अनंथ राव हे व्हरर्चुअल कान्फरन्सच्या माध्यमातुन परिषदेचे प्रमुख बिज भाषण करतील. त्याच प्रमाणे अमेरीकेतील इन्फोसिसचे सिनीअर डायरेक्टर आणि हेड अॅनालिटीक्स अजय उपाध्याय हे मान्यवर पाहुणे आहेत. आय.टी.क्षेत्रातील सद्य स्थितीत होणारे बदल यावर केसस्टडी व्दारे विश्लेषणात्मक विषयाची मांडणी ते करतील. या परिषदेसाठी देश विदेशातील संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांचे संबंधीत विषयातील संशोधनात्मक निंबंध इ.कॉन्फरन्सव्दारे प्रदर्शित होतील.

या परिषदेचा प्रमुख उद्देश, नविन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनात्मक संकल्पना मांडता यावी हा असून, येणारे चांगले संशोधनात्मक निबंध संकलित करुन त्यांचे संदर्भिय पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. असे परिषदेच्या अध्यक्षा आणि केसीई आय एम आर च्या संचालिका प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी सांगीतले. संस्थेचे प्राध्यापक, केसीईचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन करीत आहेत. निमंत्रक (कन्व्हेनर) म्हणून प्रा.डॉ.वर्षा पाठक, संगणक विभाग, प्रमुख रिसर्च आणि इन्क्युबेशन तसेच प्रा.डॉ.पराग नारखेडे, मॅनेजमेंट विभाग, आणि मॅनेजमेंट रिसर्च सेंटरचे प्रमुख हे आहेत. परिषद सचिव म्हणून प्रा.डॉ.अनुपमा चौधरी, मॅनेजमेंट विभाग या काम करीत आहेत. ,

या परिषदेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि परिसरातील संशोधक व प्राध्यापकांनी हजर राहून परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे. या परिषदेच्या प्रेस कॉन्फरन्स साठी प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे, डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे व श्री. संदीप केदार उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी पकडला एक कोटींचा गुटखा मध्य रात्रीची कारवाई

Next Post

अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन

Next Post
अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन

अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo