Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त मदतीचा हात

जळगांव(प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे 32 वर्षीय युवक कै. शंकर निकम यांचा मृत्यू झाला असे निकम कुटूंबीयाचं म्हणणं आहे. कै. शंकर निकम हे कुटुंबातील एकमेव आधार असल्याने कमवित्या व कर्त्या व्यक्तीचे डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजाने निधन झालं. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

कै. शंकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी कै. शंकर निकम यांची आई सुमनबाई निकम व पत्नी रेखा निकम या आठवड्याआधी आमरण उपोषणाला बसल्या होत्या. कै. शंकर यांच्या 3 वर्षीय कन्या कनक हिस सांभाळायला घरी कुणीही नसल्याने ती देखील दुर्दैवाने रात्रंदिवस त्यांच्याच सोबत उपोषण स्थळी होती.

या चिमुरडीकडे बघुन छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष अमोल कोल्हे यांना खुप दुःख झाले आपण निकम कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांच्या मनाशी ठरवले. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कै. शंकर मृत्यु प्रकरणी योग्य भूमिका घ्यावी अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी ही सदर कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.

शेवटी कै शंकर निकम यांच्या कुटूंबियांच्या उपोषणाची सांगता अमोल कोल्हे यांच्याच हातुन झाली. याप्रकरणी प्रक्रिया सुरू आहे व आवश्यकता पडल्यास आम्ही न्यायालयात देखील दाद मागणार आहोत, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.सदर दुर्दैवी घटना विसरणे कुटुंबियांना कधीही शक्य होणार नाही पण क्रूर नियतीवर मात करणे म्हणजेच जिवन होय. सगळी कडे दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लगबग पाहता निराधार व असाह्य कुटूंबास सणासुदीला मदतीचा हात म्हणून छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यातर्फे निकम कुटुंबातील महिला यांना साड्या, चिमुकली कनक हिस ड्रेस व दिवाळीच्या फराळाच्या वस्तूचे किट भेट देण्यात आले व सदर कुटुंबाला विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतही केली जाईल असे आश्वासित केले.

त्याच बरोबर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष दिप्ती भामरे यांनी सुद्धा अत्यावश्यक किराणा सामान भेट दिला. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिव्या भोसले उपस्थित होत्या. आपल्या सभोवताली असणाऱ्या गरजू लोकांना आपण देखील यथाशक्ती मदत करावी अशी विनंती छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी या माध्यमातून केली आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनमत प्रतिष्ठान तर्फे वृत्तपत्र स्टॉल धारकांना दिवाळी फराळाचे वाटप

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

Next Post
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d