Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कॉंग्रेसचा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ओबीसी मेळावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ओबीसी मेळावाच्या निमित्ताने महानगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,ओबीसी विभगाचे मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी,ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

       कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या मेळाव्याच्या संदर्भात नियोजन बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवन नाशिक येथे बुधवारी दुफारी पार पडली.या बैठकीला उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत ,नाशिक जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष सचिन कोठावदे,शहराध्यक्ष गौरव सोनार,प्रदेश सरचिटणीस अनिल कोठुळे ,उपाध्यक्ष मिलिंद चित्ते,सरचिटणीस जैनू पठाण ,सचिव मयूर वांद्रे,सहसचिव चारुशीला काळे,उत्तमराव बडदे,अशोक लहामगे,नंदकुमार येवलेकर,रोहन वेलदे,विशाल बागुल,विशाल सावंत,माया काळे,वैशाली थोरात,मौमुदिन शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे गेले.भाजपचे महाराष्ट्राचे नेते राज्य सरकारला जबाबदार धरत असले तरी ओबीसींचा इम्पेरीकल डाटा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.ओबीसींचे आरक्षण मिळवण्यासाठी व आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसींचे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ओबीसी मेळावा यशस्वी करावा अशी भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली.त्यामुळे मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे अभिवचन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.सुत्रसंचलन गौरव सोनार तर आभार मयूर वांद्रे यांनी मानले.       

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवजयंतीनिमित्त निराधार वृद्धाश्रमास मदत

Next Post

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

Next Post

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo