Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोराना पार्श्वभूमीवर जामनेरात चालणार तिन दिवस सर्वेक्षण; प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथकांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोराना पार्श्वभूमीवर जामनेरात चालणार तिन दिवस सर्वेक्षण; प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली  ८ पथकांची नियुक्ती

जळगांव(प्रतिनीधी)- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे व तहसिलदार व तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका जामनेर, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, शिक्षण विभाग जामनेर, महिला बालकल्याण विभाग जामनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जामनेरमध्ये ज्या भागात अधिक रुग्ण आढळुन आले आहेत व मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. तीन दिवस सदर सर्वेक्षण चालणार आहे. याकामी तहसिलदार यांनी आठ पथकांची नियुक्ती सदर सर्वेक्षणासाठी केलेली आहे. प्रत्येक पथकामध्ये न. पा. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, महिला शिक्षक, पुरुष शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक आरोग्य सहाय्यक सर्वेक्षण रिपोर्ट घेवुन त्याचा डेटा न.पा. व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला सादर करण्यासाठी तसेच प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सदर पथकावर लक्ष ठेऊन सर्वेक्षण योग्य पद्धतीने व प्रोटोकॉल नुसार होत आहे की नाही तसेच पूर्ण घरे यामध्ये अंतर्भूत होत आहे किंवा काहींचा सर्वेक्षणास नकार असल्यास याची माहिती प्रशासनास देणार आहेत. पोलिस विभागाकडून सर्वे पथकाला पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे.आज सर्वेक्षण प्रसंगी तहसिलदार व तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. किरण पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. विजयसिंह पाटील, बशीर पिंजारी, आशा कुयटे, नगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ६ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ९४ वर

Next Post

जळगाव जिल्ह्यात ३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Next Post
रावेर येथील आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव जिल्ह्यात ३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo