Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांनाही कल्याण योजनांचा लाभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांनाही कल्याण योजनांचा लाभ

जळगाव(प्रतिनिधी)- कोविड-१९ आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ देण्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहेत. गरजू कामगार पाल्यांनी मंडळाचा योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या नोंदीत आस्थापनातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मंडळातर्फे विविध आर्थिक लाभाच्या योजनासह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात.

यात प्रामुख्याने इयत्ता दहावी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी 2000 ते 5000 रुपये शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी 50,000 रुपये शिष्यवृत्ती, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक खेळांत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना 2000 ते 15000 हजार रुपये शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदीच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम 1500 ते 2500 रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य,एमएससीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या 50 टक्के रुपयांचे अर्थसाहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी 5 ते 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वलिखित पुस्तक प्रकाशनासाठी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य, शिवन मशिन खरेदीसाठी 90 टक्के अर्थसहाय्य, दहावी बारावी परीक्षेत 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे. कामगार कुटुंबीयांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळातर्फे युनिसेफच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहे.

कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पुढील तीन वर्ष त्यांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. कामगार मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता कोविड19 आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना देखील मंडळाच्या आर्थिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंडळाच्या नजीकच्या केंद्रात किंवा मंडळाचे संकेतस्थळ www.public.mlwb.in या संकेत स्थळास भेट देण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात- स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व’: डॉ. दिलीप पांढरपट्टे

Next Post

जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

Next Post
जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo