Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनावर उज़्मा बहुउद्देशीय संस्थेचा एक स्तुत्य उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव: येथील उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’या विशेष मोहिमेअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे नामांकित डॉक्टर्स आपल्या ध्वनीचित्र फितीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यावरील उपाययोजना,उपचार, निगा व खबरदारी या संदर्भात मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत.यात मुंबईचे सुप्रसिद्ध फुफुस रोगतज्ञ डॉ.जलील पारकर, सैफी हॉस्पिटल चे न्युरो सर्जेन डॉ फारूक लोखंडे, जसलोक हॉस्पिटल चे क्रिटिकल केअर इंटेनसिविस्ट डॉ खालिद अंसारी , चेस्ट फिजिशियन डॉ शाहीद पटेल, पोद्दार आयुर्वेदचे एच ओ डी डॉ बालाजी सावंत जळगाव येथील बालरोगतज्ञ डॉ राजेश पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ विलास भोळे, बालरोगतज्ञ डॉ माजीद खान, अस्थिरोग तज्ञ डॉ अनिस शेख, आयुर्वेदाचार्य डॉ अमित चौधरी, नागपूर येथील इंटर्वेनशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ समीर अरबट, मालेगांव मंसुरा कॉलेज चे प्रोफेसर डॉ अब्दुल इरफान अंसारी व कान नाक घसा तज्ञ डॉ मोहम्मद आमिर , पुणे येथील आयुर्वेदाचार्य डॉ शंतनु जोशी ,धुळे येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ सलीम शेख , हैदराबाद यथील मुफीद वेलनेस सेंटर चे मोहम्मद मुफिद खान व आहार तज्ञ जावेद अजीज सहभाग घेतील. तसेच शहरातील विविध ठिकाणी कोरोना मार्गदर्शन केंद्र सुरू केले जातील.या केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण आणि सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल.त्याचप्रमाणे शहरातील हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणी कोरोना विषयीचे जन जागृतीपर भित्तिचित्रे लावण्यात येऊन आणि हस्तपत्रके वाटून त्यातून लोकांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जाणीव व जागृती निर्माण करून कोरोनावर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अल्तमश हसन शेख यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना “आर्थिक मदतीचे धनादेश” वाटप

Next Post

शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

Next Post
शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo