Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

ठाणे दि. 20 – ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात  लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी दिले.

ठाणे  जिल्हाधिकारी  कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्ष  दिपाली पाटील,   मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस सहआयुक्त सुरेश कुमार मेकला, कल्याण मनपा आयुक्त विजय सुर्यवंशी, जिपमुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांसह  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला. यावेळी बोलताना श्री.शिंदे  म्हणाले, ठाणे जिल्ह्यात  वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. जिल्ह्याकडे विविध विभागांकडे तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग आरोग्य यंत्रणा उभारणी करण्यासाठी करण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. केंद्रीय पथकाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यात आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. आपल्याकडे कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रण करण्याबरोबरच भविष्यात रुग्ण वाढल्यास आपले नियोजन परिपूर्ण असावे यादृष्टीने सर्व व्यवस्था करावी. कोरोना  चाचण्या, उपचार यांना प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयांची क्षमता वाढविण्याबरोबरच अद्ययावतीकरणावर भर देण्यात यावा.  मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने काटेकोरपणे   नियोजन करावे अशा सूचनाही श्री शिंदे यांनी संबंधितांना दिल्या. सर्व मनपांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोविड योद्ध्यांची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आरोग्य यंत्रणेने प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन  श्री. शिंदे यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  माहिती दिली. तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये Quarantine केलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभाग तसेच प्रशासनाची चोख देखरेख

Next Post

उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

Next Post
उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे  पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo