Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

जळगांव(प्रतिनिधी)- संपूर्ण जगात ज्या कोरोना महारोगाने थैमान घातलंय त्याला थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या भारतीय आयुर्वेदात आहे असा दावा जळगाव येथील वीस वर्ष आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात अनुभव आणि कार्यरत असलेले किशोर सिंग सोलंकी यांनी केला आहे. म्हणूनच एकंदरीत रोगावर अभ्यास आणि संशोधन करुन आपण “ब्रम्हास्त्र” या सँपोनिफायरची निर्मिती केली आहे व तीच या कोरोनावर वरदान ठरु शकते असे मत सोलंकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले.

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष हे कोरोनावर लस अथवा योग्य उपचार पद्धतीकडे लागून आहे. त्यातच सोलंकी यांनी केलेला दावा हा आशादायी ठरू शकतो. पुढे सोलंकी यांनी बोलताना सांगितले की, या ब्रम्हास्त्राच्या साथीने आता निर्भीडपणे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्री जसे की, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वा इतर कुठेही जाता येईल. फक्त इतकेच नाही तर हे ब्रम्हास्त्र वापरणाऱ्या बाह्य सौन्दर्यवर जसे की, चेहरा, केस यावर यावर देखील प्रभावी ठरणार आहे. पुढील येणाऱ्या काळात ब्रम्हास्त्र हे तुमचे जीवनसाथी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाउन पाळणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, साबणाने हात धुणे असे प्राथमिक उपाय तर आहेच परंतु ब्रम्हास्त्र हे एक एडिबल साबणाचे सोलुशन असून ते तुम्ही फक्त हात पाय नाही तर तुमच्या डोळ्यात, नाकात आणि तोंडात देखील फवारू शकतात. जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या रुग्णाला या ब्रम्हास्त्राची वाफ दर अर्ध्या तासाने तीन मिनिटांपर्यंत दिल्यास रुग्ण पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो.

आयुर्वेदिक निर्मित असल्यामुळे ब्रम्हास्त्राला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसून वापरासाठी शंभर टक्के सुरक्षित आहे. एकंदरीत या रोगाने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यात आपला भारत देखील असून जर लवकर सर्व पूर्वपदावर आले नाही तर पुढे जाऊन फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. हे देशाप्रती असलेले माझे सेवाभावी योगदान आहे आणि त्यासाठीच कोरोनावर ब्रम्हास्त्र हाच उपाय असून याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे मोफत वितरण

Next Post

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Next Post
मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo