Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविडचा सामना करण्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी व १५ हजार नर्सेसेस उपलब्ध करुन देणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविडचा सामना करण्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी व १५ हजार नर्सेसेस उपलब्ध करुन देणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. 5 : राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.

राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo