Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड -१९ अँटीजन तपासणी केंद्राची विनामुल्य सेवा सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविड -१९ अँटीजन तपासणी केंद्राची विनामुल्य सेवा सुरु

महत्वाचे- रेडक्रॉस भवन येथील लसीकरण केंद्र हे सोमवार दिनांक- २९ मार्च रोजी सुरु असणार आहे.

जळगाव – सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ अॅन्टीजन तपासणी केद्र सुरु करण्यात आले. या तपासणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सतीश कुलकर्णी, नवनिर्वाचित महापौर सौ, जयश्रीताई महाजन, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, मानद सचिव श्री. विनोद बियाणी, डॉ प्रसन्नकुमार रेदासनी – रक्तपेढी चेअरमन, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा उपस्थित होते. संपूर्ण कोरोना काळात रेडक्रॉसने सामाजिक भावनेतून अतिशय उत्कृष्ठ सेवा दिली असून अजूनही सर्व पदाधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत अशा शब्दात मनपा आयुक्त श्री. सतीश कुलकर्णी यांनी रेडक्रॉसचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

हे तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महानगरपालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल,शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे. सद्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे आणि रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास उपचार लवकर करणे शक्य होईल. या सर्व बाबींचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राउत यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येत आहे. तसेच रविवारी देखील हि सेवा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. या तपासणी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी श्री. अभिजित राउत यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार!

Next Post
मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार!

मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सातवा वेतन आयोग लागू होणार!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d