Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘कोविड १९’ रुग्‍णांच्‍या संपर्कातील नजिकच्‍यांचा शोध घ्‍या-अति. मनपा आयुक्‍त संजीव जयस्‍वाल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
‘कोविड १९’ रुग्‍णांच्‍या संपर्कातील नजिकच्‍यांचा शोध घ्‍या-अति. मनपा आयुक्‍त संजीव जयस्‍वाल

परिमंडळ – २ क्षेत्रातील अधिकाऱयांसमवेत घेतला आढावा

महानगरपालिका विभागनिहाय डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या परिसरातील कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या नजिकच्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर योग्‍य ते वैद्यकीय उपचार आणि मार्गदर्शन करण्‍याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त श्री. संजीव जयस्‍वाल यांनी दिले. 

श्री. जयस्‍वाल यांनी आज (दिनांक १४ मे २०२०) दादर येथील परिमंडळ – २ मधील वरिष्‍ठ पालिका अधिकाऱयांची जी/उत्तर विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सह आयुक्‍त (परिमंडळ – २) श्री. नरेंद्र बरडे, सहाय्यक आयुक्‍त सर्वश्री. किरण दिघावकर, शरद उघडे, श्रीमती स्‍वप्‍नजा क्षीरसागर व श्री. गजानन बेल्‍हाळे तसेच आरोग्‍य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. जयस्‍वाल यांनी या बैठकीत सांगितले की, महानगरपालिकेच्‍या प्रत्‍येक विभागात डॉक्‍टर्स आहेत. कोरोनाबाधित भागातील नागरिकांना योग्‍य मार्गदर्शन करुन त्‍यांना विश्‍वासात घ्‍यावे, जे नागरिक कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कात आले आहेत, त्‍यांना शोधा आणि त्‍यांचे विलगीकरण – अलगीकरण करा. याबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रत्‍येक विभागात १०० खाटांचे सर्व सुविधांयुक्‍त कोविड – १९ च्‍या उपचारार्थ रुग्‍णालय असले पाहिजे, अ‍से सांगितले. कोरोना केअर सेंटर १ आणि‍ २ मध्‍ये सर्व नागरी सेवा-सुविधा उत्तम आणि दर्जेदार मिळतील अशी काळजी घ्‍यावी तसेच खासगी रुग्‍णालय उपलब्‍ध झाल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्‍ध नसल्‍यास पालिकेचा कर्मचारी तेथे नियुक्‍त करा, असे सांगून विविध भागात विलगीकरण केंद्र मोठ्या प्रमाणात तयार होत असून त्‍या ठिकाणी जेवण-पाणी, परिसर स्‍वच्‍छता आदी सुविधा दर्जेदार देण्‍याचे निर्देशही श्री. जयस्‍वाल यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले.  

आढावा बैठकीनंतर अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त श्री. संजीव जयस्‍वाल यांनी धारावी विभागातील प्रतिबंधित क्षेत्र आणि कोरोना केअर सेंटर १ आणि २ मधील नागरिकांशी संवाद साधला तसेच तेथील वैद्यकीय सेवा-सुविधांचा संबंधित वैद्यकीय अधिकाऱयांसमवेत आढावा घेतला.    

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरणच्या ‘मिस्ड कॉल’ सुविधेला राज्यातील 53 हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद

Next Post

कोरोनाचे आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

Next Post
कोरोनाचे आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

कोरोनाचे आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d