Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(जिमाका)- जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांवमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2021-22 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

त्याअंतर्गत फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडीसाठी उपलब्धतेनुसार अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा, महाविद्यालय, वसतीगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास दीड एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतील. या योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मी. अथवा 400 मी. धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतींचे/तारेचे कुपन घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेजींग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादीं बाबींसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.

याबाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. उल्लेख केलेल्या प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल 7 लाख रुपया पर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येईल. मात्र क्रीडा साहीत्यासाठी कमाल अनुदान मर्यादा 3 लाख रुपये इतकी राहील. क्रीडासाहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा/महाविद्यालय/वसतीगृहे यांच्याकडे मैदाने/हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत सन 2021-22 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत शासकीय संस्था, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतीगृहे इत्यादी, ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करावे.

अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे दिनांक 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव हा ऑनलाईन jalgaonsports.in या वेबसाईटवर अपलोड करुन अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला बैलपोळा

Next Post

लोकशाही दिनात प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालय प्रमुख जबाबदार -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
हतनूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी

लोकशाही दिनात प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालय प्रमुख जबाबदार -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo