Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडाशिक्षक स्व.विजय पाटील यांच्या कुटूंबियास जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक यांच्यातर्फे ६५००० रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
क्रीडाशिक्षक स्व.विजय पाटील यांच्या कुटूंबियास जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक यांच्यातर्फे ६५००० रुपयांची मदत

जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे  क्रीडाशिक्षक स्व. विजय जगन्नाथ पाटील यांचे नुकतेच कोरोनातून बरे झाल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने निधन झाले त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे तसेच मुलेही लहान असून ते आपल्या परिवारातील घटक असून त्यांच्या कुटूंबियास  आर्थिक मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे अशी आर्त हाक जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी क्रीडाशिक्षक व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक क्रीडाप्रेमी वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यांना दिली व आपल्या बांधवांच्या कुटुंबासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जामनेर गटशिक्षणाधिकारी, जामनेर तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांनीही मदत केली जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव प्रा आसिफ खान यांच्या फोन पे खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. अवघ्या दोनच दिवसात ६५००० रुपये मदतनिधी जमा झाला जमा झालेला मदत निधी स्व.विजय पाटील यांच्या पत्नी  मीनाबाई विजय पाटील व मुलगा मकरंद पाटील यांच्याकडे नेरी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांचे हस्ते नेरी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे ,जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. ए.पाटील, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव  प्रा. आसिफ खान, जामनेर येथील ललवाणी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक गिरीश पाटील, आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार्थी किशोर पाटील, एरंडोल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव सचिन महाजन, जिल्हा क्रीडा संकुलाचे विनोद कुलकर्णी, नेरी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रविण तुकाराम पाटील यांची उपस्थिती होती. सदर मदतनिधी जमा करण्यासाठी प्रा.आसिफ खान, गिरीश पाटील, प्रवीण तुकाराम पाटील नेरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्याच परिवारातील घटक समजून एखाद्या क्रीडाशिक्षकाच्या अकाली मृत्यूनंतर इतक्या भरीव प्रमाणात माणुसकीच्या भावनेतून मदत होणे ही चांगली गोष्ट असून या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. मदतनिधी देणाऱ्या जिल्हयातील सन्मानिय अधिकारी वर्ग, सन्मानिय क्रीडाशिक्षक बंधू भगिनी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे सन्मानिय क्रीडा संचालक बंधू भगिनी व क्रीडाप्रेमी यांचे राजेश जाधव यांनी मदत केल्याबद्दल आभार मानले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Next Post

वावडदा वि.का.सोसायटी चेअरमन पदी मिश्रीलाल राठोड व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo