Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडा संकुलातील सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 19 – जिल्हयात विविध खेळांचा प्रसार होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. जेणेकरुन सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना या सुविधांचा वापर करता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक त्यांच्या दालनात संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांचेसह समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात खेळाचा प्रसार होण्याबरेाबरच चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने आवश्यक तो आराखडा निर्माण करावा. क्रीडा संकुलात खेळाडूंना ज्या सुविधा पुरविण्यात येतात. त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. खेळाडूंना चांगले प्रशिक्षक लाभले तर ते आपले नैपूण्य दाखवू शकतात तसेच खेळाडूना दैनदिन सरावासाठी क्रीडा संकुलातील सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  यासाठीही क्रीडा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत . या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाची कामे लवकरात लवकर व चांगल्या दर्जाची होण्यासाठी क्रीडा विभागाने दैनंदिन भेटी देणे आवश्यक आहे. या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळयांबाबत चर्चा करण्यात आली.  तसेच खेळ सुविधा वापराचे नियमावलीत सुधारणा करणे, मॅट/बॉक्सींग रिंग वापराचे दर निश्चित करणे, क्रीडा संकुलातील खोल्यांच्या वापर आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे निर्मूलन करून कापसाचे फरदड घेवू नका – कृषि संचालक नारायण शिसोदे

Next Post

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे निर्मूलन करून कापसाचे फरदड घेवू नका - कृषि संचालक नारायण शिसोदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo