Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या गिरणा नदी परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यास दहिगाव संत आश्रमातून सुरूवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहूळेश्वर संगम,परधाडे गणपती मंदिर परिसरात परिक्रमेच्या जोरदार स्वागताची तयारी

गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, रांगोळी काढून महिला तर भजनी मंडळे करणार स्वागत;परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती

जळगाव –  गिरणा नदीला अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषणापासून वाचविणे साठी तसेच गिरणा नदीवर तयार होणारे प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी  आयोजीत केलेल्या गिरणा पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नदी परिक्रमेचा तिसरा टप्प्यास येत्या १५ जानेवारी  शनिवार पासून सुरू होत असून ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा तिसऱ्या टप्प्यात खासदार उन्मेश दादा पाटील हे दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहुळेश्वर संगम, परधाडे गणपती मंदिर असा २४  किमी पायी चालत केला गिरणा काठाचा प्रवास करणार असुन ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असुन *सर्वपक्षिय लोकचळवळ ठरत असलेल्या नदी परिक्रमेत सहभागी व्हावे*.असे आवाहन अमोल शिंदे पाचोरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.


 खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित गिरणा नदीच्या शाश्वत विकासासाठी दि. 1 जानेवारी रोजी कण्व आश्रम कानळदा ता. जि. जळगाव येथून गिरणा परिक्रमेला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 18 किलोमीटर तर सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्राजवळ असलेल्या जलाराम बाबा मंदिरापासून परिक्रमेच्या ३२ किलोमीटर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती.येत्या शनिवारी तिसरा टप्प्याचा परिक्रमेचा प्रवास पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील परमपूज्य बाबुराव महाराज यांचे आश्रमापासून परिक्रमेला सुरुवात होणार आहे. ही परिक्रमा सकाळी आठ वाजता दहिगाव संत, नऊ वाजता डोकलखेडा, साडे दहा वाजता वरसाडे, दुपारी बारा वाजता माहेजी, दोन वाजता कुरंगी, पाच वाजता दुसखेडा संगम व सायंकाळी सहा वाजता परधाडे येथे पोहोचणार असून येथे परिक्रमेचा तिसरा टप्पाचा समारोप होणार आहे. अशी माहिती अमोल शिंदे यांनी दिली आहे.
*नदी परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप*गिरणा नदीचा प्रश्न, कावेरी कॉलिंग प्रमाणे देश पातळीवर गिरणा सात बलून बंधाऱ्यांचा प्रश्न पोहोचण्याचा प्रयत्न या परिक्रमेत द्वारे केला जाणार असून गिरणा नदी परिक्रमेचे गावोगावी उत्सुर्त स्वागत होते आहे. गेल्या शनिवारी जळगाव शहर, सावखेडा ,कांताई बंधारा, दापोरा, धानोरा, लमांजन, म्हसावद सुमारे 32 कि.मी.प्रवास करीत म्हसावद पोहचली होती.येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले होते. प्रत्येकठिकाणी परिसरात गावकऱ्यांच्या सहभागाने परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप प्राप्त झाले आहे.परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती होत असुन  ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसरा टप्पात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी ३२ किमी पायी चालत केला गिरणा काठाचा प्रवास करीत  गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणेला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. अशी माहिती देखील अमोल शिंदे यांनी यावेळी दिली आहे. या परिक्रमेच्या मार्गावर बॅनर, एलईडी व्हॅन, पत्रके वाटून सहभागीहोण्याचेआवाहनकरण्यातआलेअसून विवीध सर्वपक्षिय पदाधिकारी व  पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी, गिरणा पुनरूज्जीवन अभियान प्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी 495 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी;पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत डीपीडीसीची ऑनलाईन बैठक संपन्न

Next Post

प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

Next Post
प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo