Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धचे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार

खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धचे उद्घाटन

जळगाव- (प्रतिनिधी) – जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला.

अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेचे उद्घाटन रोहित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा व पदाधिकारी, निवड कमिटीचे सदस्य संजय पवार, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी होते. अशोक जैन व अतुल जैन यांनी रोहित पवार यांचा सत्कार केला.

सुरवातीला सीआयएससीई बोर्डचा ध्वज प्राचार्य देबाशीस दास यांनी फडकाविला. ‘चले चलो…’ हे स्वागत गीत अनुभूती निवासी स्कूल मधील विद्यार्थींनी म्हटले. कलाकृतींचे प्रदर्शन ही विद्यार्थ्यांनी केले. ‘उठा के बल्ला कर दे हल्ला..’ या गीतावर सामूहिक प्रस्तूती सादर केली. त्यानंतर सर्व संघांनी मिळून मार्च पास करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आमदार रोहित पवार यांच्याकडून तांयक्वांडो स्पर्धेतील रौप्य पदक विजेती खेळाडू पलक सुराणा हिने मशाल घेतली. त्यानंतर मशाल रन झाली राष्ट्रीय क्रिकेट खेळाडून अन्मय जैन याने क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. सुयश बुरकूल यांनी खेळाडूंना शपथ दिली.

यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले की, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि माझे आजोबा मित्र होते, मोठ्याभाऊंनी संशोधनातून शेतीपूरक साहित्य पोहचवून परिवर्तन घडविले. मायक्रो इरिगेशनमध्ये जैन जगातील अग्रक्रमांकाची कंपनी बनली. प्रत्येका समोर आव्हाने येत असतात, मात्र त्या आव्हानांतून मार्गही निघतो. जीवनात आलेल्या अडचणींवर खेळभावनेतून मात करता येते ही सकारात्मक भावना ठेऊन प्रत्येक संघाने आपले सर्वाेत्तम योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहे. यास्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश-तेलंगणा, कर्नाटका-गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू- पोर्ट बेअर- अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिसा, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, बिहार-झारखंड, केरळ, दुबई आंतरराष्ट्रीय संघ असे मिळून १३ संघांतील २६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राची विजयी सलामी

साखळी सामने सुरू झाले १५ षटकांचा सामनात आज महाराष्ट्र विरूद्ध उत्तराखंड असा सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडींगणावर रंगला. ‘ए’ गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यात १५ षटकात १४५ धावांचा डोंगर उभा केला. महाराष्ट्र संघाने दिलेले आवाहन उत्तराखंडला पेलता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ८७ धावांमध्ये गारद झाला. ५८ धावांना महाराष्ट्र संघाने विजयी आघाडी घेतली. आदी लुंगानी याने महाराष्ट्राकडून ११ चेंडूमध्ये २५ धावांची धुवांधार खेळी केली त्यासोबत दोन षटकांत केवळ ७ धावा देत एक गडी बाद केला त्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याचा सम्मान रोहित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा च्या दोघंही मैदानांवर उद्याचे सामने रंगणार आहेत.

ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सामने..
सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ही ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सुरू आहे. यात ‘ए’ ग्रृपमध्ये पोर्टबेअर अंदमान निकोबार, महाराष्ट्र, ओव्हरसीस, उत्तराखंड, ‘बी’ गृप मध्ये ओडीसा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल, ‘सी’ ग्रृपमध्ये बिहार अॅण्ड झारखंड, तामिळनाडू पी. ए. निको, मध्यप्रदेश, ‘डी’ ग्रुपमध्ये कर्नाटक अॅण्ड गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ संघांचा समावेश आहे. यात ‘ए’गटात चार तर बी, सी, डी तीन गटांमध्ये प्रत्येक तीन संघ खेळ आहेत. प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत लढत देईल. उपांत्य फेरीत ‘ए’ विरूद्ध ‘डी’ तसेच ‘बी’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या ७० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा;महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा;महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा;महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo