Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

जळगाव-(प्रतिनिधी)- वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस ही संस्था कष्टकरी महिला आणि त्यांच्या पाल्यांसाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेत आमदार राजुमामा भोळे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. शाळा लांब असलेल्या आणि गरजू विद्यार्थिनींना सुलभ शिक्षणासाठी सायकल पुरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रविवारी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. आधार जेष्ठ नागरिक संघ यांच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०० विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी, जैन ब्रदर्स तर्फे पी.एस. नाईक, मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संभाजीराव देसाई आणि अध्यक्षस्थानी आमदार राजुमामा भोळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय देत जैन ब्रदर्स तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्याबद्दल अशोकभाऊ जैन यांचे आभार मानले. तसेच संस्थेचा उद्देश केवळ शैक्षणिक मदत न करता चांगले संस्कारयुक्त नागरिक घडविण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आपल्या भाषणात आमदार राजुमामा भोळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे आणि चांगले संस्कार घेतले पाहिजेत. आई-वडील, शाळा, शहर, राज्य आणि देशाचे नाव उज्वल करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजे. मी नेहमी तुमच्यासोबत आहे, तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊ शकता,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

पाहुण्यांनी आपल्या भाषणांतून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय अर्चना पाटे यांनी करून दिला. शेवटी शालिनी चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरला सूर्यवंशी, तनुजा चोपडे, श्यामल शिंदे, छाया पाटील, ज्योती दातेराव, सुनीता महाजन, चंद्रकला पाटील, संगीता पाटील, भारती पाटील, पूजा पंडित, कामिनी पांडे, वंदना पांडे, रुपाली पवार, प्रणाली नेवे, साक्षी सूर्यवंशी, नीता गुरव, समाधान पवार तसेच जेष्ठ नागरिक सभासद यांनी मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Next Post

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

Next Post
शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo