Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)- गांधी विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी गांधी तीर्थ ही अप्रतिम आणि परिपूर्ण स्थळ आहे. गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक ठरत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रीया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे जागतिक दर्जाचे गांधी तीर्थ समजून घेण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका यांची देखील उपस्थीती होती. “गांधी तीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून अदभूत, शानदार असे तीर्थ निर्माण केले आहे. भविष्यातील पिढीला हे कार्य प्रेरणा देणारे एक यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. गांधी विचार सहज समजावे या मुख्य उद्देशासाठी कदाचित असे म्युझियम अन्य कुठेही नसावे. या पवित्र वास्तुची निर्मिती साकारली व गांधी विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यास ते यशस्वी झाले याबद्दल त्यांच्या कार्याला मन:पूर्वक अभिवादन करतो.” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. तब्बल तीन तासाहून अधिक वेळ देऊन अशोक गहलोत यांनी गांधी तीर्थ या म्युझियमची परिपूर्ण माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिष्टमंडळसुद्धा होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. गांधीतीर्थसह जैन हिल्स येथील श्रद्धाधाम व परिश्रम यांची देखील पाहणी करून माहिती घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार – राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

Next Post

स्वच्छता ही सेवा अंतर्गत एरंडोल तालुक्यात प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबवणार- अर्चना खेतमाळीस

Next Post
स्वच्छता ही सेवा अंतर्गत एरंडोल तालुक्यात प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबवणार- अर्चना खेतमाळीस

स्वच्छता ही सेवा अंतर्गत एरंडोल तालुक्यात प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबवणार- अर्चना खेतमाळीस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo