Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

८ टन कचरा संकलित – जकात नाक्याचा श्वास मोकळा

जळगाव, दि. २४ प्रतिनिधी : शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी आज शिरसोली रोड परिसर, कृष्णा लॉंन परिसर, गणपती मंदिर परिसर व जकात नाक्याचा श्वास मोकळा केला. रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत १०० हून अधिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने शिरसोली रोड परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला. सकाळी दहा वाजता रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने शिरसोली रोडवर हि फेरी निघाली. जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला. त्यानंतर शिरसोली रोड परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. येथील परिसरात कित्येक दिवसांपासून कचरा साचल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती.

पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, हेमंत बेलसरे हे या उपक्रमावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

आयुक्त्तांची तत्परता…

विद्यार्थी, स्वयंसेवकांच्या स्वच्छतेनंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या उपक्रमाच्या समन्वयकांनी जळगाव शहराच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना संपर्क साधला असता, डॉ. विद्या गायकवाड यांनी तत्काळ तिथे कचरा गाडीच्या सहाय्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत!

Next Post

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo