Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव (01) प्रतिनिधी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, संचालिका सौ. ज्योती जैन, सौ. अंबिका जैन, गिता धर्मपाल, डॉ. जॉन चेल्लादूराई प्रत्यक्ष हजर होते. तर महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. अनुभूति इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक निखील क्षिरसागर, श्री. सारंग यांनी गांधीजींना प्रिय असलेले वैष्णव जन..हे भजन म्हटले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व त्यांचे गांधी विचार प्रचार प्रसाराचे कार्यविस्तार याविषयी सौ. अंबिका जैन यांनी प्रास्तविक करताना सांगितले. ऑनलाईन पद्धतीने गांधी विचार आजच्या कठिण काळातही किती महत्त्वपूर्ण आहेत हे डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन यांनी विशद केले. सौ. ज्योती जैन यांनी विश्व अहिंसा दिनानिमित्त उपस्थितांना अहिंसेचे प्रतिज्ञा दिली. गांधी तीर्थ लवकरच व्हर्चुअल होत आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हर्चुअल टूर साठी टिझर लॉंच करण्यात आला. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.


कार्यक्रमाचे थेट प्रसारण ‘गांधी तीर्थ’ यांच्या सोशल मीडिया

पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live/ या https://youtu.be/AUJHAHP-ImA ला सकाळपासून करण्यात आले. दुपारपर्यंत जगभरातुन 10 हजाराच्यावर लोकांनी गांधी तीर्थच्या सोशल मीडिया पेजवर भेट दिली. दरम्यान कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण वरिल सोशल पेजवर अजुनही पाहता येईल.

गांधी विचारातूनच सध्याचे संकट कमी करता येईल- डॉ. अनिल काकोडकर


सध्या कोव्हीड-19 च्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले त्यामुळे स्थलांतरही वाढले. ही वस्तुस्थिती असताना संतुलीत ग्रामिण व्यवस्था निर्माण करण्याचे गांधीजींचे स्वप्न आज किती महत्त्वपूर्ण ठरले असते ह्याची जाणिव होते. महात्मा गांधीजींच्या ग्रामस्वराज्यावर भर देणारे विचार आजही शाश्वत आहे. महात्मा गांधीजींच्या विचार व संस्कारांवर चालले तर एक स्वस्थ व संतुलीत भारत घडविता येईल यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे असा संदेश डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला.


एकांतवास म्हणजे तपस्या – तुषार गांधी


महात्मा गांधीजींनी येरवडा तुरंगाला मंदीर म्हटले कारण त्याठिकाणी राहून बंदीवासातील वेळेचा उपयोग त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी केला. एकांतवास म्हणजे स्वतला जागृत करणे अशी त्यांची धारणा होती. लिखाण, वाचनासह जे जे चांगले करता येईल याचा विचार केला त्यामुळेच चांगले जगता आले. सध्या कोव्हीडमुळे आयसोलेशन व्हावे लागते परंतू महात्मा गांधीजींच्या एकांतवासाच्या विचारांतून प्रेरणा घेतली तर स्वस्थ भारत घडू शकतो असा संदेश महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी दिला.


गांधीजींच्या विचारांतूनच भवरलालजींनी कृषी संस्कृतीत केले परिवर्तन- डॉ. सुदर्शन अय्यंगार


‘महात्मा गांधी यांच्या तत्त्वांवर आधारित भवरलालजी जैन यांची विचार सृष्टी’ या विषयावर ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्याची परिस्थीती कठिण असली तरी हिम्मत आणि धैर्याने काम केले तर यावर मात करता येईल. अनेक कठिण काळात महात्मा गांधीजींचे मुल्य जपणे म्हणजे साधारण कार्यातून सामाजिक दायित्वासह असाधारण कार्य करणे होय. हे कार्य भवरलालजी जैन यांनी केले. व्यक्ती, समाज आणि सृष्टी यांच्यात परिवर्तन घडविण्याचे काम भवरलालजी जैन यांनी कृषी संस्कृतीला विज्ञानाची जोड देत केले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान दिले. यातून गांधीजींच्या ग्रामिण अर्थ स्वातंत्र्याचा मुलमंत्र जपला गेला. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, बंधुता, न्याय ह्या गांधीजींनी सांगितलेल्या जीवनमूल्यांवरच भवरलालजी जैन यांनी कार्य केले. भवरलालजी जैन यांनी संस्कारित केलेला अपरिग्रहाचा वारसा जैन परिवार व जैन परिवारातील प्रत्येक सदस्य जपत असल्याचाही उल्लेख डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केला.


महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत- अशोक जैन

प्रासंगिक संदेश देताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन म्हणाले की, बदलत्या जीवनशैली व सद्यपरिस्थितही महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत आहेत. संकटाची परिस्थिती आहे मात्र हताश, निराश न होता नैतिक मुल्ये जपत सामाजिक दायित्वाची जबाबदारी घेत पुढे चालत राहणे म्हणजे गांधी विचारांवर मार्गक्रम करणे. हा प्रयत्न वडिल भवरलालजी जैन यांनी केला. तोच प्रयत्न जैन परिवार करित आहे. गांधी विचारातुनच देशातील उत्पादकांचा भूमिपुत्रांना लाभ व्हावा यासाठीच जैन इरिगेशन प्रयत्न करित असल्याचे अशोक जैन म्हणाले.

चरखा जयंतीनिमित्त अखंड सूतकताई

महात्मा गांधी जयंती ला चरखा जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रांगणात दिवसभर अखंड सूतकताई करण्यात आली. यामध्ये फाउंडेशनचे सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार -राजनंदिनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन

Next Post
आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार -राजनंदिनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन

आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार -राजनंदिनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d