Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित गीत रामायणा वर आधारीत दृक-श्राव्य माध्यमातून सादर होणारी अजरामर रचनांवर नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगम असलेली एक अंकी नृत्य नाटिका आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम साडे तीन मुहूर्ता पैकी एक पुर्ण मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात शनिवार दि. २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला डॉ. भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

प्रभू रामांचे दिव्य कथा संकीर्तन युगानुयुगे सुरूच राहिल इतके ते सामर्थ्यवान आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अश्या कै. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या अजरामर रचनांना बाबूजी अर्थात कै. सुधिर फडके यांनी संगीत देऊन गीत रामायण घराघरात पोहोचविले, आणि हेच दिव्य गीत रामायण हाच या नृत्य नाटिकेचा मुळ गाभा. किर्तन परंपरेतील आदिगुरू देवर्षी श्री. नारद मुनी आणि नर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक आदिगुरू श्री. भरत मुनी या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत झाला आहे.

संत श्री. एकनाथ महाराजांचे श्री भावार्थरामायण संत श्री. तुलसीदास यांचे श्री रामचरितमानस सद्गुरू श्री. अनिरुद्ध बापूंचे श्री रामरसायन या सर्व दिव्य ग्रंथांचे मार्गदर्शन या रचनेस लाभले आहे. पद्मभूषण गुरु डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांनी पुनरुज्जीवित केलेली भरत नृत्यम् ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली हे याचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तानी गायन शैलीतील गीते व त्यास दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे आगळेवेगळे स्वरूप रसिकांना मोहिनी घालते. गीतरामायणा याशिवाय या नृत्यनाटिकेत किर्तन आख्यानातील पदे, आर्या, दिंडी इ. तर सादर होतेच पण प्रत्येक रचने पूर्वी निरुपण सादर होते. किर्तन परंपरेतील आदिगुरू देवर्षी श्री. नारद मुनी आणि नर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक आदिगुरू श्री. भरत मुनी या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत झाला आहे.

चुकवू नये अश्या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाने केले असून या कार्यक्रमाच्या सशुल्क सन्मानिकेसाठी संपर्क – दिपिका चांदोरकर, “दिपज्योत”, महात्मा गांधी मार्केट समोर, जळगाव. मोबाईल नं. 9823077277. कार्यक्रम संध्याकाळी ठीक ७ वाजता सुरू होईल. रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आलेले आहे.


टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशिअल मिडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवा – महाविकास आघाडी जळगाव महानगरची मागणी

Next Post

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- आरिफ शेख जैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न

Next Post
जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- आरिफ शेख जैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- आरिफ शेख जैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo