Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुलाबजामच्या गोडव्याने लग्न समारंभात वाढवली कटुता; कारण वाचून व्हाल थक्क!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/04/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
गुलाबजामच्या गोडव्याने लग्न समारंभात वाढवली कटुता; कारण वाचून व्हाल थक्क!

पुणे- येथील लग्नात या हाणामारीला कारण ठरलं आहे गुलाबजाम पण ही हाणामारी नातेवाकांमध्ये झालेली नसून जेवण बनवणाऱ्या केटरर्स व्यवस्थापक आणि नातेवाईकांमध्ये झाली आहे. लग्नात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून नातेवाइक व केटरर्स व्यवस्थापक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

पुण्यातील हडपसरच्या शेवाळेवाडी येथे मंगळवारी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हाणामारीत जखमी झालेल्या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक दिपांशु गुप्ता (26, रा. राजयोग मंगल कार्यालय, शेवाळेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाह सोहळा होता. या लग्नसोहळ्यातील केटरिंगचे काम फिर्यादींकडे होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडील व्यक्तीने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे केटरिंगचे व्यपस्थापकाला सांगितले. त्यावेळी दिपांशु गुप्ता यांनी तुम्ही जेवण घेवण घेऊन जाऊ शकता काही हरकत नाही असे सांगितले.

गुप्ता यांनी हरकत नसल्याचे सांगितल्यावर वर पक्षातील त्या व्यक्तीने नातेवाइकांसह राहिलेले जेवण डब्यात भरण्यास सुरुवात केली.त्यावेळी एक जण डब्यामध्ये तिथे असलेले गुलाबजाम भरू लागला. मात्र त्यावेळी गुप्ता यांनी त्यास विरोध केला.’हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे ते घेऊन जाऊ नका,’ असे गुप्ता यांनी सांगितले.

यावरुनच गुप्ता यांचा वर पक्षातील लोकांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. वर पक्षाकडील लोकांनी शाब्दिक वाद वाढवून तिघांनी गुप्ताला मारहाण केली. तसेच गुप्ता यांना लोखंडी झारा मारून जखमी केले. या सर्व प्रकारानंतर मंगल कार्यालयाचे मालक तिथे आले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.या सर्व प्रकारानंतर दिपांशु गुप्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हडपसर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोंपीचा शोध सुरु केला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

महिला आणि पुरुष सर्वात जास्त काय मोबाईलवर सर्च करतात; जाणून घ्या सविस्तर….

Next Post

पाण्याचा ‘हा’ व्यवसाय बनवेल तुम्हाला लखपती…

Next Post
पाण्याचा ‘हा’ व्यवसाय बनवेल तुम्हाला लखपती…

पाण्याचा 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला लखपती...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo