Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीतर्फे क्रिडा पुरस्कार प्रदान जिल्ह्यातील 60 खेळाडुंचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गोदावरी अभियांत्रिकीतर्फे क्रिडा पुरस्कार प्रदान जिल्ह्यातील 60 खेळाडुंचा गौरव

खेळाडूंचा सन्मान करणे आयुष्यातील सर्वोच्च क्षण डॉ. केतकी पाटील

जळगाव दि. २८ — जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन जळगांव व गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

खेळाडूंचा सन्मान हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून विश्वचषक जिंकणाऱया संघाची भेट घेतली त्या सोहळ्याची आज आठवण झाली असे गौरवोद्गार डॉ. केतकी पाटील यांनी काढले.या जिल्हा क्रीडा पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ केतकी पाटील,माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाले,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील व क्रीडा संचालक प्रा. डॉ. आसिफ खान उपस्थित होते.

यामध्ये 49 क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच गणपत संभाजी पोळ ( सर ) राधेश्याम माधवलाल कोगटा, डॉ. प्रदीप प्रभाकर तळवेलकर, विष्णू रामदास भंगाळे, प्रोफेसर डॉ. किशोर पंडितराव पाठक, मिर्झा इकबाल बेग उस्मान बेग यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ४ गट तयार करण्यात आले.

यात खासगी इंग्लिश मिडीयम शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा,उच्चमाध्यमिक(ज्यू.कॉलेज) महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय असा समावेश होता.

याशिवाय ४४ क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ रोड, एम. आय. डी. सी. जळगाव. येथे पार पडला.सर्व प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. माजी आ. चंद्रकांत सोनावणे यांनी असो. माध्यमातून प्रत्येक वर्षी 50 खेळाडूंचा सन्मान करण्याचा मानस बोलून दाखवला. तर खेळाला प्रोस्साहन देण्यासाठी प्रयत्न करून मोठे खेळाडू घडावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. अनघा चोपडे ठरल्या 300 Km BRM ब्रेवेट दी रन्डोन्नेउर इंटरनॅशनल इव्हेंट पुर्ण करणारी जळगावची पहिली महिला

Next Post

खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Next Post
खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo