Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरवात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरवात
जळगाव(प्रतिनिधी)- मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. प्लेसमेंट झाल्यानंतर आयुष्यात करीयरचे मार्ग खर्‍या अर्थाने स्पष्ट होतात आणि चालु शेवटच्या वर्षात शिकत असतांना नामांकित कंपनीमध्ये निवड होणे ही खरी कौतुकास्पद गोष्ट असते.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) मध्ये निवड झाली आहे. हि संगणक विभागासाठी खुपच गौरवास्पद बाब आहे. संगणक विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी मुसेब शेख (३.३६ ङझअ), मिलींद प्रकाश पाटील (३.३६ ङझअ), इरम शेख (३.३६ ङझअ) यांची टीसीएस या नामांकित कंपनीत निवड झालेली आहे. त्यांना प्रत्येकी ३.३६ लाखाचे प्रत्येक पॅकेज कंपनीमार्फत देण्यात आले आहे. त्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्याच्या यशामध्ये सहकार्याचा मोठा सहभाग हा विभागप्रमुख प्रा.प्रमोदगिरी गोसावी यांचा आहे. त्यासोबत विभागातील वरिष्ठ प्रा.डॉ.ज्ञानेश्‍वर किरंगे, प्रा.निलेश चौधरी, प्रा.निलेश वाणी, प्रा.माधुरी झंवर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. टे्रनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना निवडीच्या संधी सद्यस्थीतीला वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातुन प्लेसमेंट ड्राइव्ह वेगवेगळ्या टप्पयात चालू आहे, त्यामध्ये विप्रो, टीसीएस, इव्होसीस, सुबेक्स, मॉर्गन स्टेनले, डिलॉई, अ‍ॅटॉस सिंटेल, जियो डिजीटल लाईक, एनटीटी डाटा, इन्फ्रासॉफ्ट टेक, व्हर्च्युसा, आयबीएम, अ‍ॅपल, आयनेक्शर, सीआरएम नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचा समावेश आहे. आगामी काळात या कंपन्यांमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी आहे.

 आज महाविद्यालयातील संगणक विभागात ६२ विद्यार्थी, यंत्र विभागात ६५, विद्युत विभागात ६७ आणि अणु विद्युत आणि दुरसंचार विभागात १३ विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. या सर्वच विद्यार्थ्यांना या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी व त्यांची यशस्वी निवड होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहे. सर्वच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हमखास निवड होईल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी व्यक्‍त केला आहे.   
Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

३१ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Next Post

लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम; मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d