Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम; मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम; मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी प्रतिबंधक असलेल्या लसीकरण मोेहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे कार्य हे सर्वोत्तम असल्याचे मत समता फाऊंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आले. लसीकरण मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनने सामाजिक जाणीवेपोटी राष्ट्रकर्तव्य पार पाडले आहे. दरम्यान या कार्याची दखल घेत मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह समता फाऊंडेशनचे एरिया मॅनेजर शिवनंद महालिंगे, मॅनेजर मोहन केंद्रे, हेल्थ अ‍ॅक्टीव्हिटी इन्चार्ज तानाजी गौंड, हेल्थ ऑफिसर राम लंके, राजेंद्र दौड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते. समता फाऊंडेशन हे आरोग्य, बंदीगृह, शिक्षण आणि रोबोटीक शिक्षण या क्षेत्रात कार्य करते. तसेच आदीवासी क्षेत्रातही संस्थेमार्फत काही शाळा दत्तक घेण्यात आल्या.

भुसावळ तालुक्यातील खडका, किन्ही, कन्हाळा बु. आणि खु. या ठिकाणी समता फाऊंडेशन, गोदावरी फाऊंडेशन, ग्रामपंचायत, सहायक जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. पांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १० हजार नागरिकांना पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला. या मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. गोदावरी फाऊंडेशनतर्फे नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल समता फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी संस्थेचे आभार मानले. दरम्यान या निमीत्ताने समता फाऊंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

तसेच संस्थेचे प्रतिनीधी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठीही समता फाऊंडेशन कार्य करणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरवात

Next Post

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

Next Post
कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo