Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी आय.एम.आर. मध्ये जळगाव विभाग क्रीडा समितीची प्रथम सभा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी आय.एम.आर. मध्ये जळगाव विभाग क्रीडा समितीची प्रथम सभा

जळगाव(प्रतिनिधी)- येथील के.बी.सी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग क्रीडा समितीचे यजमान पद शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमैंट अ‍ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयास मिळाले असून क्रीडा समितीची प्रथम सभा २ डिसेंबर रोजी महाविद्यालयात झाली.

या सभेस प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जे.बी. अंजाने, प्राचार्य ऐनपूर महाविद्यालय, डॉ. इंद्रसिंग पाटील, प्राचार्य, एस.एम. महाविद्यालय, मुक्ताईनगर, डॉ.के.पी. पाठक, प्राचार्य, खाशाबा महाविद्यालय, जळगाव, डॉ. प्रतिभा ढाके, बी.ओ.एस. प्रातिनिधी, तसेच जळगाव विभाग क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत एस.वारके, सचिव प्रा.चंद्रकांत वा. डोंगरे हे उपस्थित होते.सदर सभेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या तारखांचे नियोजन, निवड समिती सदस्य व मार्गदर्शकाची नियुक्ती व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

जळगाव विभाग क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत एस. वारके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करतांना सर्वप्रथम यजमान पदाची संधी मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा स्पर्धाना अधिकाधिक कार्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न तसेच दर्जेदार खेळाडूंची निवड जळगाव विभागासाठी करुन विद्यापीठाचे नावठौकीक वाढवावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी जळगाव विभागातील विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. संजय चौधरी, डॉ. पी.आर. चौधरी, प्रा. सतिश कोगटा, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. अनिता कोल्हे, डॉ. सचिन झोपे, डॉ. जी.एस. भारतळे, डॉ. मुकेश पवार, डॉ. आनंद उपाध्ये, डॉ. नवनीत असी, डॉ. विरेंद्र जाधव, डॉ. अमोल पाटील, डॉ. संतोष बडगुजर, प्रा. किरण नेहते, प्रा.एस.एम.वानखेडे, प्रा. निलीमा पाटील, प्रा. जितू पाटील, प्रा. वाय.डी. देसले, प्रा.संजय जाधव, प्रा. नितीन चौधरी आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अश्विनी सोनवणे यांनी केले. सभेच्या यशस्वीततेसाठी महाविद्यालयातील डॉ. निलीमा वारके, प्रा. चेतन सरोदे, प्रा.एम.के.गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. चारुशिला चौधरी, प्रा. श्रुतिका नेवे, योगेशराज नेतकर, दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, जयश्री चौधरी, प्रशांत किरंगे, प्रफुल भोळे, गणेश सरोदे, जीवन पाटील, रुपेश पाटील, भावना ठाकूर, धनश्याम पाटील यांनी सहकार्य केले.

Team Satymev Jayate

Previous Post

विकास विद्यालय जळगाव खु. येथे कृषी शिक्षण दिवस साजरा

Next Post

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 70 वा स्मृतिदिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo