Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार
जळगाव(प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले ह्यांनी दाखविलेल्या रस्त्यावर महात्मा गांधीजींनी केलेले मार्गक्रमण आणि त्या दरम्यान १९३६ मध्ये महात्मा गांधी हे जळगावात आले होते आणि फैजपुर येथील काँग्रेसच्या अधिवशेनात सहभागी झाले, त्यावेळी माझ्या गोदावरी आईने महात्मा गांधी यांना जवळून पाहत, त्यांचे विचार ऐकले आणि ते आमच्या मनावरही बिंबवले असे अभिमानाने डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्‍त पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाचे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्‍त शुक्रवार, १ ऑक्टोबर रोजी डॉ.केतकी पाटील हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार डॉ.प्रमोद भिरुड, नर्सिंग प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे, नर्सिंग डायरेक्टर शिवानंद बिरादर, गांधीच्या वेशभुषेत असलेला अंतिम वर्षाचा विद्यार्थी अत्‍तदीप ताकसांडे हे उपस्थीत होते. सर्वप्रथम लाल बहादुर शास्त्री आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

 दररोज महाविद्यालयाची स्वच्छता ठेवणार्‍या स्वच्छता कर्मचारी स्टाफमधील १० जणांचा यावेळी डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यावेळी स्वच्छता कर्मचार्‍यांचे आभार मानण्यात आले.गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी यांच्या कार्याची महती विशद केली तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान नार्‍याचेही महत्व सांगितले.


याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांनीही महात्मा गांधी यांचे शिक्षण, त्यांचे कार्य याबाबत विवेचन करत आपण आणि आपला परिसर हा स्वच्छ असावा, असा संदेशही दिला. याप्रसंगी उपस्थीतांना आपण स्वच्छता राखूया अशी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेक्‍चरर ऑलिव्हीया रॉस, आभार वैष्णवी पवार यांनी मानले. याप्रसंगी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, लेक्‍चरर सुमैय्या शेख, सुमित निर्मल, ऑलिव्हीया रॉस आदिंच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Team Satymev Jayate

Previous Post

तात्या बाबांसारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही; कै.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता

Next Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत ‘पदव्युत्तर’साठी तीस टक्के राखीव जागा असाव्यात -आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत ‘पदव्युत्तर’साठी तीस टक्के राखीव जागा असाव्यात -आरोग्य मंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo