Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीतर्फे पक्षांसाठी परळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीतर्फे पक्षांसाठी परळ वाटप

जळगाव – गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी ३०३० यांच्या संयुक्त वतीने गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयामध्ये सामाजिक बांधिलकी अंतर्गत पशुपक्षी, प्राणी यांना पाणी पिण्यासाठी परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरीयन संजय शहा, (माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, संचालक प्रेमजी भवानजी जळगाव), डॉ. विजय पाटील (प्राचार्य गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), महेश पाटील उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधतांना डॉ. प्रशांत वारके यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले. तसेच राज्यात सर्वत्र उष्णतेची प्रचंड लाट आली आहे आणि यामुळे मानवाची तसेच पशुपक्षी, प्राण्यांची जीवाची लाही होत आहे. जसे आपल्याला पाण्याची गरज असते तशीच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा भासते. उष्णतेमुळे पाण्याचा सुद्धा तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य आहे की या मुक्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना आपण पाणी दिले पाहिजे यासाठी आपण हे परळ वाटप करत आहोत. हे परळ गोदावरी फाऊंडेशन संचलित सर्व महाविद्यालयांमध्ये रोटरॅक्ट मेंबर्सला व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले व यामध्ये पाणी भरून योग्य ती काळजी घ्या अशी सूचना देण्यात आली.

सदर परळ महाविद्यालयाचा परिसरात ठेवताना माणसाचा हस्तक्षेप नसेल अशाच ठिकाणी ठेवावा याची काळजी घ्यावी जेणेकरून पशुपक्षी, प्राणी तेथे येतील असे आवाहन यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी रोटरॅक्ट मेंबर्सला व विद्यार्थ्यांना केले. सदर परळ संजय शहा यांनी उपलब्ध करून दिलेत.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयामधील एमबीए, बीबीए, बीसीए मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. आफ्रिन खान, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.अश्विनी सोनावणे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदि कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विभागीय लोकशाही दिनाचे 9 मे रोजी आयोजन

Next Post

कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo