Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोरेगावातील सिंधुदुर्ग एकता संघानेगरजुंना दिला ‘एक हात मदतीचा’- सुमारे १०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भावर वाढत असतानाही गोरेगाव पूर्व येथील सिंधुदुर्ग एकता संघाने माणुसकी तसेच सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवित सुमारे १०० गरजुंना ‘एक हात मदतीचा’ पुढे करीत गरजुंना अन्नधान्याचे वाटप केले आहे. कोरोनामुळे देश गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व सामान्य जनता भरडली गेली आहे. राज्य शासनाने काही अटी व शर्तीवर खाजगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली असली तर अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लगल्या आहेत. अनेकांना दोन महिने पगारही मिळालेला नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असल्याने घराचा मासिक खर्च कसा भागवायचा, अशी चिंता सतावत आहे. या कठीण समयी विविध लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांकडून गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. परंतु अद्यापही अनेक गरजुंना अन्नाधान्याची गरज असल्याचे लक्षात येताच गोरेगाव पूर्व येथील सिंधुदुर्ग एकता विकास संघातर्ङ्गे आगा खान एजन्सी ङ्गॉर हॅबिटेट इंडिया तसेच डी.सी.बी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गोरेगाव दिंडोशी येथील संतोष नगर, जयभीम नगर, दळवी कंम्पाऊंड, सिंग कंम्पाऊंड, नागरी निवारा परिषद, बी.एम.सी. वसाहत, श्रीकृष्ण नगर, जलधारा गृहनिर्माण संस्था, आरे कॉलनी युनिट क्रमांक १३ तसेच वडके कंम्पाऊंड येथील सुमारे १०० गरजुंना या अन्नधान्याचे वाटप करण्यात  आले  असून अजुनही काही जणांना मदत करण्यात येणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग एकता विकास मंचाचे अध्यक्ष अरुण साटम यांनी सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्यामंदिरात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Next Post

आम आदमी पार्टी तर्फे शिक्षण मंत्र्यांना निवेदन; महामारी काळात पालकांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाऊले उचलावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d