Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन;१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन;१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश

जळगाव-(प्रतिनिधी)-जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. २१ रोजी सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (JISL) या आघाडीच्या कृषी कंपनीकडून आंबा उत्पादनक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. आंब्याच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खतसिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण / जनुकप्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळांमध्येच पिकवलेले आहेत.

जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे, त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच, संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत.
विदेशी वाणांमध्ये ऑस्ट्रेलियाचे किंगस्टन प्राईड, पामेर, ऑस्टिन, फिलिपाईन्सचा कॉरोबो, अमेरिकेचे केंट व टॉमी अटकिन्स, थायलंडचा किंगफॉन, आणि इस्राईलचा माया यांचा समावेश आहे. विविध नावाजलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या रत्ना, मल्लिका, सोनपरी यांसारखे दर्जेदार वाण देखील प्रदर्शनात आकर्षण ठरू शकतील.
या प्रदर्शनात केवळ विविध आंबा वाण पाहण्यासाठीच नव्हे तर आंबा क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे सविस्तर माहिती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. जैन इरिगेशनच्या या उपक्रमामुळे शेतकरी, बागायतदार, संशोधक तसेच आंबा रसिक यांना आंबा उत्पादनाच्या नव्या वाटा व शक्यता समजून घेता येणार आहेत. ‘मँगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिरसोली रोडवर असलेल्या गौराई ग्रामोद्योग मॉलतर्फे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

Next Post

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था वर भुसावळ चे संतोष मराठे यांची अध्यक्षपदी निवड

Next Post
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था वर भुसावळ चे संतोष मराठे यांची अध्यक्षपदी निवड

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था वर भुसावळ चे संतोष मराठे यांची अध्यक्षपदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo