Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार -ग्रामविकास मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार -कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर(जिमाका)- कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. ऋतूराज पाटील, सरपंच सागर भोगम, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सदस्य सर्वश्री शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, करवीर पं.स. सभापती मंगल पाटील, आदी उपस्थित होते.

श्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी मनरेगामधून पाणंद रस्ते निर्मितीचे नियोजन करावे. राज्यातील 4 लाख 20 हजार असंघटीत कर्मचाऱ्यांना आपल्या विभागामार्फत संरक्षण देण्याचा आपला मानस आहे. हदवाढ भागात समाविष्ट होण्यासाठी कळंबे गावातील ग्रामस्थांनी सकारात्मकतेने विचार करावा, असे आवाहन करून उपस्थित नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ग्रामपंचायत ही ग्राम विकासाचे द्वार दाखवणारी संस्था आहे. कळंबे गावच्या विकासासाठी आर्थिकनिधी कमी पडू देणार नाही.

ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत उभारणीकरिता 25/15 योजनेंतर्गत 50 लाखांचा निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यमान खासदारांनी या प्रस्तावित इमारतीसाठी 25 लाखांचा निधी दयावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोविडचा पहिला डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले .याप्रसंगी खा.संजय मंडलिक,आ .ऋतूराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही नूतन इमारत लवकरच उभारण्यात येणार आहे.

याप्रसंगी महसूल विभागाकडून प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्याचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच शालिनी पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, मिनाक्षी पाटील यांच्यासह, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच श्री. भोगम तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक दिलीप तेलवी यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची दिवाळी कोविड योध्यासोबत साजरी

Next Post

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

Next Post
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo