Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, यासाठी गरज पडल्यास आणखी रुग्णवाहिका देऊ -मंत्री धनंजय मुंडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, यासाठी गरज पडल्यास आणखी रुग्णवाहिका देऊ -मंत्री धनंजय मुंडे

बीड(प्रतिनिधी)- ग्रामीण भागात रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागास 31 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होणार नाही, याकडे पुढील काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर देण्यासाठी तब्बल 31 नवीन सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका आज दाखल झाल्या असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज या रुग्णवाहिकांचे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात लोकार्पण करण्यात आले. बीड जिल्ह्यात इतक्या संख्येने एकत्रित रुग्णवाहिका मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर जिल्हा रुग्णालयांतर्गत विविध उपजिल्हा रुग्णालय येथे देण्यासाठी आणखी 12 रुग्णवाहिका मंजूर असून, येत्या आठवडा भरात त्या 12 रुग्णवाहिका देखील जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री श्री.मुंडे यांच्यासह आ. संदीप भैय्या क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा.आ.सुनील धांडे, मा.आ. सय्यद सलीम, शिवाजी सिरसाट, जि प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांसह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा आरोग्य विभागास या काळात बळकटी मिळाली आहे. जिल्ह्यात काम सुरू असलेल्या पैकी 8 ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे जात असून, याव्यतिरिक्त विविध आधुनिक सामग्री जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

समता नगरात नीर फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व स्टूडेंट चॅरिटीच्या वतीने विधी सेवा शिबीर संपन्न

Next Post
समता नगरात नीर फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व स्टूडेंट चॅरिटीच्या वतीने विधी सेवा शिबीर संपन्न

समता नगरात नीर फाउंडेशन, युवाशक्ती फाउंडेशन व स्टूडेंट चॅरिटीच्या वतीने विधी सेवा शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d