Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी सकारात्मक चर्चा होऊन ‘मार्ड’ने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्धल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पावले उचलेल असा विश्वास व्यक्त केला.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यस्तरीय कापूस परिषद तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलली

Next Post

ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, यासाठी गरज पडल्यास आणखी रुग्णवाहिका देऊ -मंत्री धनंजय मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo