Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागात गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ग्रामीण भागात गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

जळगांव(चेतन निंबोळकर)- देशात कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र जळगांव जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचा काहीही एक फरक पडलेला दिसून येत नाही. जिल्हा लॉकडाउन चा फायदा घेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध गावठी दारु धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हातील डोंगर वाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. लॉक डाउनमुळे सर्वत्र जिल्ह्यात दारू बंदी असल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारू कडे वळला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध गावठी दारूवाले जास्त फोफावल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील विविध गावात हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनांसाठी जंगलांचा वापर केला जातो आहे. यामुळे या जंगलाचा फायदा घेत सर्रास गावठी दारुची विक्री होत आहे. पोलीस प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. गावठी दारुची आतिशय घातक असुन सुरवातीला अवैध दारू तयार करण्यासाठी नवसागर काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू करणाऱ्यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विरोधात केसेस केल्या जात असल्या तरी अवैध दारूची निर्मिती बंद झालेली नाही. दोघांच्याही कारवाईचा तुलनात्मक अभ्यास केला तर दारूच्या भट्यांवर कारवाईपेक्षा अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. असे मत सामान्य लोक व्यक्त करत आहेत.

दारू बुकिंग साठी मोबाईलचा उपयोग

सध्या सर्वत्र जिल्हा बंद असल्याने तसेच तळीरामाना बाहेर निघता येत नसल्याने ग्रामीण भागात दारू विक्रीसाठी हायटेक प्रणालीचा वापर केला जात आहे. सोशल मिडिया ग्रुप, मोबाईल द्वारे ऑर्डर घेऊन, एस.एम.एस ने बुकिंग करत दारूचे पाहिजे ते ब्रँड उपलब्ध झाले आहेत. मात्र याकडे पोलिस सर्रास दुर्लक्ष करत आहे. सर्व जिल्हा लॉक डाउन असला तरी कचराकुंडीत, गटारीत देशी व विदेशी दारुच्या बाटल्यांचा ढीग कसा? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वावडदा येथे कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण फवारणी

Next Post

गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम:गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

Next Post
गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम:गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

गावाच्या भल्यासाठी लोकनियुक्त सरपंचाचा अनोखा उपक्रम:गेल्या चार दिवसांपासून गावात करत आहे जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d