Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक गट स्थापन करावे- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्रामीण भागात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक गट स्थापन करावे- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जळगाव, दि.20 – भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट स्थापन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे एस.बी.पाटील, एनसीसीचे नारायण पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सामाजिक कार्य अधिकारी एस.एस. भोलाणे, संजय बेलोरकर, प्रमोद बारके, रेड क्रॉसचे सचिव विनोद बियाणी, युवक मंडळ सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक रणजीत राजपूत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या. अधिकाधिक उपक्रम आणि मोहीम राबवून युवक आणि मंडळांना नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करा, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच आजपर्यंत घेतलेल्या आणि पुढे घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सांगितले.

जलशक्ती अभियानच्या भित्तीपत्रकाचे अनावरण

जिल्हा युवा सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलशक्ती अभियान – ‘कॅच द रेन’च्या भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज 152 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Next Post
छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo