Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घर व बांधकामासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
घर व बांधकामासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी


जळगाव, दि. 28 (जिमाका) – पावसाळयामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळेत खालील बाबींचा समावेश करण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लास्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इत्यादी वस्तू विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व घटक सुरु राहतील. तसेच 15 ते 20 मे या कालावधीत चक्रीवादळामुळे तसेच आगामी येणाऱ्या मान्सून कालावधीत घर तसेच इतर बांधकाम यांची दुरुस्ती, सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने व घटक सुरु राहतील.
या नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी/कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्ष 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. या बाबींशी निगडीत असणाऱ्या सर्व व्यक्ती कोविड-19 नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. नियमांचे उल्लघंन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांचेकडून रुपये 10 हजार मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविड -19 चा संसर्ग कमी होईपर्यंत सदरचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.
या सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण; अकरावीसाठी प्रवेश परीक्षा – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Next Post

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo