Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चाळीसगाव येथील बंजारा समाजाच्या तीन अभियत्यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

बंजारा समाजाचे उत्कृष्ट कुशल संघटक इंजी.अनिल राठोड, इंजी.दयाराम राठोड यांच्यासह अभियंत्यांनी केला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/10/2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
चाळीसगाव येथील बंजारा समाजाच्या तीन अभियत्यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

मुंबई – (प्रतिनिधी) – आज दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार, दैनिक सामना संपादक शिवसेनेची बुलंद तोफ संजयजी राऊत साहेब यांच्या उपस्थितीत आज बंजारा समाजातील उच्चशिक्षित तरुण,म्हाडा सेवानिवृत्त अभियंता अनिल राठोड यांनी आपल्या सहकारी मित्र अभियंत्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. *खासदार संजय राऊत साहेब यांच्या हस्ते अभियंता अनिल राठोड, दयाराम राठोड यांचा शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते संजय सावंत, माजी खासदार उन्मेशदादा पाटील,लोकसभेचे उमेदवार करणदादा पवार, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अभियंता आमदार करणार – अनिल राठोड
बंजारा समाजातील उच्चशिक्षित तरुण,म्हाडा सेवानिवृत्त अभियंता अनिल बद्रीनाथ राठोड,ठाणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता दयानंद रामदास राठोड, अभियंता मिञ परिवारासह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.गेल्या दहा वर्षांपासून अभियंता माजी खासदार, माजी आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात सर्व समाजांना सोबत घेऊन राजकारण करण्याचे जे सोशल इंजिनिअरिंग सुरू होती यातून प्रभावीत होवून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या चाळीसगावात जातीपातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना इंजी.अनिल राठोड यांनी व्यक्त केली.
अनिल राठोड यांचा चाळीसगावात झाला होता झंझावाती दौरा
चाळीसगावातील बंजारा समाजाच्या युवकांच्या ,जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे समाजातील उमदा तरुण अनिल राठोड यांचा गेला पंधरवाड्यात बंजारा समाजाच्या युवकांनी जंगी तसेच गावोगावी बॅनर लावून त्यांचे स्वागत केले होते.तेव्हापासून अनील राठोड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.आज त्यांच्या प्रवेशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विजयाकडे घौडदौड सुरू असून महाविकास आघाडी मजबूत होणार असून परीवर्तन अटळ असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगीसाठी कक्ष स्थापन;आवश्यक कागदपत्रे लागणार

Next Post

प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील समजून काम करा ! शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे महायुतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo