Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री छगन भुजबळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री छगन भुजबळ

राज्यस्तरीय सचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक दि. 1- कोरोना काळात सर्व काही बंद असताना महाराष्ट्र शासनाने न थांबता जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवले. याचा लेखाजोखा सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले

मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर  येथे आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, अपर आयुक्त (महसूल) भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, उपायुक्त (महसूल)गोरक्षनाथ गाडीलकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त भगवान वीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रवींद्र परदेशी, उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे,  जिल्हा‍ माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, माहिती सहायक जयश्री कोल्हे, किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळातही महाराष्ट्र थांबला नाही. राज्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. याचाच लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. 1 ते 5 मे 2022 पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नाशिक मधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने व शहरातील सर्व नागरिकांनी भेट देवून शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी नाशिककरांना केले आहे.

प्रदर्शनात दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती

मागील दोन वर्षातील कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, शालेय शिक्षण आदी विभागांची कामगिरी मोलाची राहिली आहे. यासह सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृहनिर्माण, वस्त्रोद्योग, महसूल, वन, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा, गृह, पर्यटन, पर्यावरण, कौशल्य विकास, मराठी भाषा आदी विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. 

मध्यवर्ती ठिकाणी ‘माहिती व जनसंपर्क भवनाची’ उभारणी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकारांना अधिस्वीकृतीच्या माध्यमातून बस प्रवास, रेल्वे प्रवास यासारख्या सेवा उपलब्ध केल्या असून सध्या नाशिक विभागात 327 अधिस्वीकृतीधारक पत्रकार असून त्यातील सर्वाधिक म्हणजे 120 नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यात 44 वृत्तपत्रे शासनमान्य जाहिरात यादीवर आहेत. शासनाने नुकत्याच राज्यात सर्व जिल्हास्तरावर माहिती व जनसंपर्क भवन बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी त्याची उभारणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

Next Post

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित;राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश

Next Post
जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित;राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी- विविध सहा ठराव पारित;राष्ट्रीय एकात्मता व विश्व शांतीचा संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo