Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल गायकवाड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल गायकवाड

एरंडोल ( ) – 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन संपूर्ण राज्यात साजरा करण्यासाठी एरंडोलला देखील आहारातून आरोग्याकडे-मोफत शरीर तपासणी आणि आहार मार्गदर्शन शिबीराचे एरंडोलला आयोजन करण्यात आले.
एरंडोलचे आरोग्यदूत-कोरोना योध्दा विक्की खोकरे,व आहार सल्लागार सौ.सविता पाटील यांनी सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात करण्यात आलेल्या कार्यक्रमाच अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त तहसिलदार तथा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरूण माळी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, गुजर समाज अध्यक्ष गोपाल पाटील होते. यावेळी प्रा. आर. एस. पाटील, राजेंद्र शिंदे सर, साळी समाज महिला अध्यक्षा शोभा साळी, ग्राहक कल्याण अध्यक्षा आरती ठाकूर, शेतकरी संघटनेच्या मालती पाटील, हर्षाली महाजन, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड, पत्रकार संजय चौधरी, कृष्णा हॉटेलचे संचालक कृष्णा धनगर, ज्येष्ठ नागरीक संघाचे, सुपडू शिंपी, जाधवराव जगताप, विश्वनाथभाऊ पाटील, नामदेवराव पाटील,विलास पाटील, आर के पाटील,आदींची उपस्थिती लाभली.


यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार नाशिकचे गोपाल गायकवाड, पुण्याचे पंकज देशमुख, नारायण ठोंबरे, चेतन बोर्डे, सविता पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. निरोगी जीवनासाठी मोफत शरीर तपासणी, आहार मार्गदर्शन, वजन कमी करणे अथवा वाढविणे यासाठी सल्ला, मार्गदर्शन, पोषक आहार, पोट आणि पाठीवरील चरबीचे प्रमाण यांचे संतूलन राखण्यासाठी, वय, उंचीनुसार वजन, स्नायूंची ताकद याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित नागरीक, महिलांनी लाभ घेतला. एरंडोलला प्रथमच अशाप्रकारचा अभिनव उपक्रम-मोफत राबविणार्‍या विक्की खोकरें व सविता पाटीलचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात कौतूक करून धन्यवाद दिलेत. महिलांनी अशाप्रकारच्या मार्गदर्शन उपचार पध्दतीचा लाभ घेवून वजन कमी केल्याची माहिती दिली.


अरूण माळी, प्रा. अहिरराव, रमेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्की खोकरे यांनी केले तर सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पाटील, सविता पाटील,मयुर पाटील, अमिन मुजावर, शुभम गायकवाड, जितेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.
शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

Next Post

महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे “मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव “कविता संग्रह प्रसिद्ध

Next Post

महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे "मानवता" आणि" मुक्तिदाता भीमराव "कविता संग्रह प्रसिद्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo